प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
राहुरी तालुक्यातील चिंचोली येथील शेतकरी दीपक लाटे वय ३१ वर्ष याने दारु पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिंचोली येथील गावातील व्यसनाधीन तरुण योगेश उर्फ सोन्या उराडे हा तरुण दीपक लाटे याला दारू पिण्यासाठी नेहमी पैशाची मागणी करत असतो. दि.30 जून रोजी चिंचोली फाट्यावर दीपक लाटे याला दारु पिण्यासाठी पैशाची मागणी केली. दीपक लाटे यांनी पैसे न दिल्यामुळे योगेश भगवान उराडे यांनी शिवागाळ करत दम दिला व तूला बघून घेतो असा म्हणाला. काल राञी ९/३० वाजण्याच्या सुमारास दीपक लाटे याची पत्नी ज्योती, आई मंगल, चिंचोली येथिल राहत्या घरासमोर असताना योगेश भगवान उराडे(रा. चिंचोली), सतिष खपके (दवणगांव ता राहुरी) ! सुधाकर वर्पे (रा. पिंपळगांव, फुणगी ता. राहुरी) हे मोटार सायकल क्रमांक एम एच 17 ए यु 3215 वरुन आले. त्यामधील योगेश उराडे यांने हातात लोखंडी रॉड घेऊन दारु पिण्यासाठी पैसे का देत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली.
त्यासोबत असले सतिष खपके व सुधाकर वर्पे यांना तो म्हणाला की तुम्ही याला पकडून ठेवा. मी यांच्या डोक्यात लोंखडी रॉड घालतो. त्या दोघांनी मला पकडून ठेवले व योगेश उराडे यांनी माझ्या डोक्यात लोंखडी रॉड घातला व दीपक यांना गंभीर दुखापत केली. मार लागल्याने मोठ्यामोठ्याने आरडाओरड केली असता लाटे यांची पत्नी ज्योती, आई मंगल, बबन लाटे चुलतभाऊ रविन्द साहेबराव लाटे व कामगार ज्ञानेश्वर डुके व गणेश हाळनोर यांनी मध्यस्थी करुन सोडवा सोडव केली असता त्यांना देखील त्यांनी शिविगाळ व लाथा बुक्यांनी मारहाण केली. तुम्हीमध्ये आले तर तुमचा काटा काढू, असा दम दिला.
राहुरी पोलिसांता दीपक लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार योगेश भगवान उराडे रा चिंचोली, सतिष खपके रा दवणगांव, सुधाकर वर्प यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरिक्षक मुकुंद देशमुख करत आहे.
buy tadalafil online reddit – tadalafil citrate best place to buy tadalafil online reviews