दुधाला किमान 35 रुपये भाव देण्याची मागणी
श्रीरामपूर – कृषी सप्ताह दिनानिमित्त राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री महादेवराव जानकर यांच्या नेतृत्वाखालील राज्यात दुग्ध दरवाढीच्या मागणीसाठी सर्वच तलसील कार्यालयावर आंदोलन केले जात आहे. शेतकर्यांच्या दुधाला किमान ३५ रुपये दराने भाव मिळावा. या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रीरामपूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांनी दूध दरवाढीच्या मागणीसाठी श्रीरामपूर तलसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.
श्रीरामपूर तहसील कार्यालयाच्या समोर पांडुरंगाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालून शेतकर्यांच्या दुधाला किमान ३५ दराप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी रासपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या तिघाडी सरकारने शेतकर्यांच्या प्रति लिटर दुधाला १० रूपये अनुदान स्वरुपात देऊन या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
मुख्यमंत्री महोदयांना हे पांडुरंगा तू सद्दबुद्धी द्यावी, असे साकडे पाडूरंग चरणी घालण्यात आले आहे. यावेळी कोरोना संदर्भातील सर्वच कायदेशीर नियमाचे पालन करत आंदोलन करण्यात आले. तरी आपल्या स्तरावर शेतकऱ्याचे दूध दराबाबतच सरकाराने लक्ष घालून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. श्रीरामपूरचे नायब तहसीलदार गुजांळ यांनी शेतकर्याचे निवेदन स्वीकारले.
यावेळी रासपचे जिल्हा सचिव डॉ. सुनिल चिंधे, रासपचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय कचरे, मनोज देवकाते उक्कलगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक बापूसाहेब चिंधे, सतिश देठे, मंजाबापू खेमनर, अक्षय चक्रनारायण, गणेश हाळनोर, बाळासाहेब माकोणे,आदी गावचे कार्यकर्ते उपस्थित होते.
tadalafil 20 – buy tadalafil online tadalafil 20mg