Corona: जिल्ह्यात आज  ५ कोरोना बाधित; १४६ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

0

श्रीरामपूरतील 4 जण बाधित

अहमदनगर– येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर येथील एक जण तर श्रीरामपूर मधील चौघांचा समावेश आहे. दरम्यान आज १४६ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

पारनेर मधील ४५ वर्षीय पुरुष, श्रीरामपूर मधील ३० व २४ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष आणि ७ वर्षीय मुलगा बाधित आढळून आले आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली.”

तीन दिवसांपूर्वी श्रीरामपुरात कोरोना व्यक्तीचा मृतदेह पाठवण्यात आला होता. त्याच व्यक्तीच्या संबंधित हे चार रुग्ण असल्याने श्रीरामपूर करांची काळजी वाढली आहे. संबंधित व्यक्तीच्या दफनविधीसाठी किती लोक होते? या बाबतीत प्रशासनाकडून आणि उपस्थितांकडून वेगवेगळी माहिती दिली जाते. प्रशासन माहिती का लपविते? असा प्रश्नदेखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, श्रीरामपूर मध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने येथील बाजारपेठ गुरुवार ते रविवार चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय येथील व्यापारी संघटनेने घेतला आहे. तसा संदेश श्रीरामपूर मध्ये सोशल मीडियात फिरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here