#Coronadeath : Aurangabad : शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

औरंगाबादमधील शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग दोन दिवसांत दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे. तसेच आरोग्य यंत्रणेमध्येही खळबळ उडाली आहे. रावसाहेब आमले आणि नितीन सावळे, असे या नगरसेवकाचे नाव आहे. 

नितीन सावळे यांना आठवडाभरापूर्वी कोरोनाची लागण असल्याचे समजले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. ते औरंगाबादच्या बालाजीनगर वार्डातून निवडून आले होते.

नगरसेवक रावसाहेब आमले यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी देण्यात येणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. नगरसेवक आमले आणि सावळे यांच्या मृत्यूमुळे शिवसेनेचे औरंगाबादेत मोठे नुकसान झाले आहे, अशी भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here