ShrirampurBreaking : अज्ञात वाहनाच्या धडकेत मिल्लतनगर येथील तरूण ठार 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर – गोंधवणी रोडवरील डावखर मंगल कार्यालयाच्या नजीकच आज दुपारी चार वाजताच्या सुमारास अज्ञात चार चाकी वाहनाच्या धडकेत प्रभाग नंबर १ भागातील मिल्लतनगर येथील २४ वर्षीय तरुण भीषण अपघातात जागीच ठार झाला.

भीषण अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव सोहेल शेख असे सांगितले जात आहे. मयत हा प्लाॅटिना मोटारसायकल वरून जात समोरून येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहन भरधाव वेगाने चालून समोर जात असणार्‍या मयत शेख यांना उडवून देऊन गाडी चालक ताबडतोब जागेवरून गाडीसह फरार झाला.

अपघात झाल्याची माहिती कळताच संरपच भारत तूपे दाखल होत सदरच्या घडलेल्या घटनेची माहिती श्रीरामपूर शहर पोलिसांना कळवली होती. घटनास्थळी पोलिस दाखल होत परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात वाहनाचा तपास करत आहे. याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर शहर पोलिस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here