प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अहमदनगर – ७५ वर्षांच्या आजीबाई आणि ६ वर्षाच्या चिमुकलीसह आज ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली. या आजारातून बरे होऊन त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
यामध्ये अहमदनगर मनपा १७, राहाता ०५, नगर ग्रामीण ०५, पारनेर, जामखेड, आणि अकोले येथील प्रत्येकी ०२, शेवगाव, श्रीरामपूर, श्रीगोंदा येथील प्रत्येकी एक रुग्ण यांचा समावेश आहे. आज ३६ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने जिल्ह्यात बऱ्या झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता ४५५ इतकी झाली आहे. तर सध्या १८३ रुग्ण उपचार घेत आहेत.
७५ वर्षांच्या आजीबाई या नगर शहरातील पद्मा नगर भागातील तर ०६ वर्षांची मुलगी ही तोफखाना भागातील आहे. नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी ही माहिती दिली.
buying tadalafil online safely – tadalafil 20 tadalafil 5mg