Kada : बँका, कृषी, महसूलकडून शेतक-यांची थट्टा

0
सोमवारी संबूळ वाजवून करणार निषेध – आमदार धस
राष्ट्रीयकृत बँकांसह कृषी व महसूल विभागाकडून शेतक-यांची थट्टा सुरू असून, याच पद्धतीने कर्ज वाटप प्रक्रिया राबविल्यास वर्ष संपलं तरी शेतक-यांना कर्ज मिळणार नाही, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी केली. याकडे लक्ष वेधून कारभारात सुधारणा होण्यासाठी सोमवारी संबंधित बँका, तसेच कृषी व महसूल कार्यालयासमोर संबूळ वाजवून निषेध आंदोलन करणार असल्याचेही धस यांनी सांगितले.

यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार धस म्हणाले की, काही राष्ट्रीयीकृत बँकांनी बनविलेले अॅप एका दिवसाला केवळ 15 ते 20 शेतक-यांनाच कर्जवाटप करु शकते. या पद्धतीने कर्ज वाटप प्रक्रिया सुरु राहिल्यास वर्ष संपले तरी कर्ज वाटप होणार नाही. हजारो अर्ज धूळ खात पडलीत. शेतक-यांची हेळसांड बँकच्या अधिका-यांकडून केली जात आहे. तसेच कृषी व महसूल विभागाने या सर्व बाबींकडे दुर्लक्ष केल्याने शेतक-यांची सर्वांनी मिळून थट्टा चालविल्याचे दिसत आहे. अशा अधिकारी व राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून सोमवारी हे आंदोलन करणार आहे.

राष्ट्रीयीकृत बँकांची शेतक-यांना कर्ज द्यायची मानसिकता नाही. त्यामुळे ज्या बँकांनी पिक कर्जाचे अर्ज स्वीकारलेले आहेत. अशा सर्व बँकांसमोर संबूळं वादन करण्यात येणार आहे. निकृष्ट दर्जाचे सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, कृषी विभाग कंपन्यांना पाठीशी घालत आहे. बीड जिल्ह्यात एकही विमा कंपनी पीक विम्यासाठी तयार होत नसल्याने सरकारने स्वतःच्या कंपनीलाच पीकविम्यासाठी तयार करावे. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीतील फळबागांची हेक्टरी 18 हजार रुपये नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्यां ना मिळालेली नाही.

पीक न उगवलेल्या शेतक-यांकडे महसूल विभागाने डोळेझाक केली आहे. त्यामुळे बँका व कृषी विभागाला एकप्रकारे मोकळीक दिल्याचे दिसत आहे. या सर्व बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँका, महसूल विभाग या सर्व कार्यालयांच्या समोर संबूळ वादन व बैलगाडी मोर्चाचे आयोजन केले असल्याची माहिती आ. धस यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here