CBSE Board : दहावी-बारावीचा निकालाची तारीख अद्याप जाहीर नाही-सोशल मीडियावरील माहिती चुकीची – बोर्डाचे स्पष्टीकरण

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सीबीएसई बोर्डाचा दहावी-बारावीचा निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. सोशल मीडियावरील माहिती चुकीची आहे, असे स्पष्टीकरण बोर्डाच्या अधिका-यांकडून देण्यात आले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेचा हवाला देऊन सीबीएसईचा निकाल उद्या 10 जुलै रोजी लागणार आहे, असा संदेश सोशल मीडियातून फिरत होता. मात्र, हे वृत्त चुकीचे असल्याने एएनआयनेही हे वृत्त मागे घेत असल्याचे सांगितले आहे.

सीबीएसई बोर्डाने काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाला दिलेल्या माहितीत 15 जुलैपर्यंत दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकाल जाहीर होण्याचे संकेत दिले होते. मात्र, सीबीएसई बोर्डाकडून अद्याप तशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बोर्डाकडून परीक्षांच्या निकालाबाबत तयारी सुरु आहे. निकालाची तारीख लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here