Beed : साक्षाळपिंप्री आणि वंजारवाडी येथे पूर्णवेळ संचारबंदी – जिल्हाधिकारी रेखावार

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड – तालुक्यातील साक्षाळपिंप्री आणि वंजारवाडी येथे कोरोना विषाणूची लागण (COVID-१९ Positive) झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथे काही भागात कन्टेनमेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रकिया दंड सहिंता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री व वंजारवाडी येथे कोरोना बाधित झालेले रुग्ण आढळून आले आहेत, असा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये. म्हणून बीड तालुक्यातील साक्षाळपिंप्री व वंजारवाडी या दोन्ही गावात कन्टेनमेंट झोन (Containment zone) घोषित करण्यात आले असून पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचार बंदी लागू करण्यात आली आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने  त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here