Ahmednagar: जिल्ह्यात काल ६६ रुग्णांची भर; नगरमध्ये 13, सोनई 10, संगमनेरमध्ये 9 रुग्ण…

1

१३ रुग्णांची कोरोनावर मात

२०२ व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह

आज येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री ३६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये, नगर महापालिका क्षेत्रातील १३, सोनई (नेवासा) येथील १०, संगमनेर तालुक्यातील ०९, श्रीगोंदा तालुक्यातील ०२, शेवगाव तालुक्यातील ०१ आणि भिंगार येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
नगर महापालिका क्षेत्रात पद्मा नगर येथे एक, सिद्धार्थनगर ०२, चितळे रोड ०६, टिळक रोड ०१, सारस नगर ०१, सावेडी ०१, शिंपी गल्ली ०१ असे रुग्ण आढळून आले. नेवासा तालुक्यातील सोनई येथे १० रुग्ण बाधित आढळून आले.

संगमनेर तालुक्यात हिवर गाव पावसा ०१, गुंजाळ मळा ०२, कसारा दुमाला ०१, मिर्झापूर ०१, घुलेवाडी ०३, चास पिंपळदरी ०१ असे रुग्ण आढळून आले.

श्रीगोंदा तालुक्यातील चिंबळा ०१, चांबूर्डी ०१ असे रुग्ण आढळून आले.
शेवगाव तालुक्यातील निँबे नांदूर येथे एक रुग्ण आढळून आला.
भिंगार येथील गवळी वाडा येथेही एक बाधित रुग्ण आढळून आला.
याशिवाय, खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेले ०९ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये नगर मनपा क्षेत्रातील ०३, राहाता ०३, श्रीरामपूर ०२ आणि पाथर्डी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान आज सकाळी एकूण २१ बाधित रुग्ण आढळून आले. यामध्ये नगर मनपा ०८(अरणगाव रोड, केडगाव (०५), सर्जेपुरा, तारकपुर आणि गवळीवाडा प्रत्येकी ०१.)
श्रीरामपूर तालुका ०२, नेवासा तालुका ०२, अकोले तालुका ०१, संगमनेर ०१, श्रीगोंदा तालुका ०१, राहुरी तालुका ०१, जामखेड तालुका ०२, भिंगार ०१, पारनेर ०१ आणि कर्जत तालुक्यातील एक रुग्ण आढळून आला होता.

उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या: २८०
• बरे झालेले रुग्ण: ४९४
• मृत्यू: २०
• एकूण रुग्ण संख्या: ७९४
• (स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

आत्ता पर्यंत सोनई मध्ये कोरोनाचा एकही रुग्ण
नव्हता, त्यामुळे सोनई कर अगदी बिनधास्तपणे फिरत होते. पण आजच्या कोरोना चाचणीत सोनईतील 20 पैकी आठ रुग्णाचा अहवाल निगेटीव्ह आला आणी दहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे अहवाल मिळाल्याने नागरिक धास्तावले. हे दहाजण कोणत्या परीसरातील आहेत याचीच चर्चा गावात सुरू असुन गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सोनईत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित सापडल्याने यापुढे प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार व वायरस अधिक पसरु नये या साठी सोनई सील करण्यात येणार का? याकडे गावकर्यांचे लक्ष असुन सोनई तील एक रुग्ण कोरोना सदृश आजाराने मरण पावल्याने गावात कोरोनाची दहशत पसरली आहे.

1 COMMENT

  1. नमस्कार, अजय जागीरदार अकोला फ्रीलान्स फोटोग्राफर आहे. आणि वृत्तपत्रासाठी देखील मी फोटोग्राफी करत असतो आणि 30 वर्षापासून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here