Newasa : धक्कादायक सोनईमध्ये एकाच वेळी दहा रुग्ण कोरोना बाधित

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सोनई – आत्तापर्यंत सोनईमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. त्यामुळे सोनईकर अगदी बिनधास्तपणे फिरत होते. पण आजच्या कोरोना चाचणीत सोनईतील वीसजणापैकी आठ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आणि दहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचा अहवाल मिळाला. यामुळे नागरिक धास्तावले असून हे दहाजण कोणत्या परिसरातील आहेत. याचीच चर्चा गावात सुरू असून गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सोनईत एवढ्या मोठ्या संख्येने कोरोना बाधित सापडल्याने यापुढे प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार व वायरस
अधिक पसरु नये यासाठी सोनई सील करण्यात येणार का याकडे गावक-यांचे लक्ष असून सोनईतील एक रुग्ण कोरोना सदृश आजाराने मरण पावल्याने गावात कोरोनाची दहशत पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here