राष्ट्र सह्याद्री
प्रतिनिधी प्रतिनिधी : नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी गुरुवारी ( दि.9) रोजी संगमनेर येथे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची भेट घेऊन कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोण- कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, यासंदर्भात चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक राम टेकावडे,महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षा अर्चनाताई पानसरे, नगरसेवक राजेंद्र पवार,डाॅ रवींद्र जगधने, शहराध्यक्ष लकी सेठी,शकिल बागवान,अॅड राजेश बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच आहे. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्यात, काय काळजी घ्यावी याबाबत नगराध्यक्षा आदिक यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी चर्चा केली.
tadalafil generic – tadalafil 10mg tadalafil cheap tadalafil