राष्ट्र सह्याद्री
संगमनेर प्रतिनिधी : संगमनेर मध्ये कोरोनाने बाधित असलेल्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असून कोरोनाने आता तालुक्यातील ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे त्यामुळे प्रशासन बरोबरच नागरिकांची जबाबदारी वाढत चालली आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्या आता द्विशतकाच्या पुढे गेली असून सर्वत्र काळजीचे वातावरण पसरले आहे.आज संगमनेर खुर्द मधील त्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याच्या कुटुंबातील एका तेरा वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा झाली आहे.तर सायंकाळी एकूण 11 जणांचा अहवाल पॉजिटिव्ह आला आहे त्यात शहरातील तेलिखुंट येथील 57 वर्षीय व्यक्ती,कुरण रोड वरील 75 वर्षीय व्यक्ती, तालुक्यातील निमोण 64 वर्षीय व्यक्ती, कुरण गावातील 29 वर्षीय युवक, तर कनोली गावातील 25 वर्षीय महिला,64 वर्षीय व्यक्ती, 28 वर्षीय महिला, 32 वर्षीय व्यक्ती तर ढोले वाडी येथील 35 वर्षीय व्यक्ती, 18 वर्षीय युवक व 8 वर्षीय मुलगा यांचा अहवाल पॉजीटिव्ह आला आहे त्यामुळे संगमनेर तालुक्याच्या बाधित रुग्ण संख्येने 206 चा आकडा गाठला आहे.
संगमनेर मध्ये काल रात्री काल सकाळी एक, सायंकाळी चार कोरोना बधित रुग्ण सापडल्या नंतर रात्री पुन्हा 9 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कालची एकूण 14 रुग्ण संख्या झाली होती तर काल रात्री नव्याने नऊ रुग्ण सापडलेल्यामध्ये घुलेवाडी येथील एक12 वर्षीय मुलगी, 34 वर्षीय पुरूष व 56 वर्षीय महिला आहे. तसेच कासारा दुमाला येथील 74 वर्षीय वृद्ध, व 24 वर्षीय तरुणी, हिवरगाव पावसा येथिल 70 वर्षीय महिला,गुंजाळवाडी येथील 29 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय तरुणी आणि मिर्झापुर येथील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मागील 4 दिवसापासून कोरोनाने संगमनेर तालुक्यात उग्र रूप घेतले असून, ठराविक ठिकाणी असलेला कोरोना आता सर्वदूर पसरला आहे. त्यामुळे तालुक्यातील खेडेगावमध्येही घबराटीचे वातावरण तयार झाले आहे.
