Newasa : मुळाकाठ परिसरात जोरदार पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी (पाहा व्हिडिओ)

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

करजगांव : नेवासा तालुक्यातील मुळाकाठ परिसरातील करजगांव, शिरेगांव, खेडले -परमानंद, लांडेवाडी, अंमळनेर परिसरात जोरदार पाऊस झाला. तब्बल तीन तास झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे कपाशी, मका, जनावरांचा चारा पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले. ओढे नाले, शेत भरभरून पाण्याने वाहत आहे.

करजगावमध्ये कसबे, गायकवाड, शिरसाठ आदीच्या घरात पाणी शिरले होते. करजगांव येथील आंबेडकर चौक परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. करजगाव-लांडेवाडी रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. सर्वत्र शेतामधून पाणीच पाणी दिसत होते. जोरदार झालेल्या पावसाने शेतक-यांना दिलासा मिळाला असला तरी मका, कपाशीचे वाया जाण्याची शक्यता आहे. पावसाने वातावरणातील उष्णता कमी झाली असुन बोअरवेल,विहीरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here