Shrigonda : राजकीय गदारोळ, बाजार समितीचे सभापती धनसिंग पाटील भाईटे यांचा राजीनामा!

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती धनसिंग पाटील भाईटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा डीडीआर यांच्याकडे दिल्याची माहिती दिली. तसेच एका विचाराच्या लोकांना एकत्र घेऊन पुढची दिशा ठरविणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

गेली पावणेचार वर्षे त्यांनी बाजार समितीच्या सभापती म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे सहीचा अधिकार नव्हता. धनसिंग भोईटे यांना कै. शिवाजीराव नागवडे यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जाते. बाजार समितीमध्ये नागवडे आणि पाचपुते गटाची एकत्र सत्ता असूनही नामधारी राहण्यापेक्षा राजीनामा देऊन त्यांनी पदावरून पायउतार होणे पसंत केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here