कोकमठाण शिवारात तरुणीची आत्महत्या

0

    राष्ट्र सह्याद्री

कोपरगाव प्रतिनिधी : तालुक्यातील कोकमठाण येथील एका चोवीस वर्षीय तरुणी कु.उज्वला भगवान शेळके हिने पढविचे लोखंडी अंगलला आपल्याच ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.या प्रकरणी भगवान बाबुराव शेळके (वय-५५) धंदा नोकरी आत्मा मलिक ध्यानपीठ यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे,भगवान बाबुराव शेळके हे आपली पत्नी,दोन मुली असे कुटूंबासमवेत राहतात.त्यांतील एक चोवीस वर्षीय मुलगी कु.उज्वला भगवान शेळके हिने आज पहाटेच्या अडीच वाजेच्या सुमारास नैसर्गिक विधीच्या निमित्ताने घरातून बाहेर आली व तिने कोणालाही काही न सांगता बाहेरील पढवीच्या लोखंडी अंगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला आहे.घटनास्थळी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बोरसे घटना स्थळी दाखल झाले होते.या घटनेची कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू र.नं.२७/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here