बिबटयाच्या हल्ल्यात शेळीचा फडशा

0
राष्ट्र सह्याद्री
श्रीरामपूर  प्रतिनिधी : तालुक्यातील उक्कलगाव व दवणगाव फाटा शिवारात  बिबट्याने चांगलाच धुमाकुळ घातला असून,येथील असणाऱ्या सोमनाथ बाळासाहेब थोरात यांच्या वस्तीवर बिबट्याने जाळीत बांधलेल्या शेळीवर झडप घालून नजीकच्या उसात शेळीला फडफडत नेत शेळीचा फडशा पाडला सदरची घटना शुक्रवारी मध्यरात्रीत दोन वाजताच्या सुमारास उक्कलगावात घडली.बिबटयाच्या संचाराने येथील स्थानिक लोक चांगलेच भयभीत झाले आहेत. परिसरात संततधार पाऊस सुरू होता त्यावेळीच बिबटयाने थोरात वस्तीवर बिबट्याने धुमाकूळ घातला अनेक दिवसांपासून प्रवरा नदीपात्र परीसर गोदावरी नदीपात्र नजीकच्या परिसरात बिबट्याचा कायमच वावर असल्याने येथिल लोक चांगलेच
 धास्तावले आहे सोमनाथ थोरात यांनी वनधिकार्‍यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली असता वनसंरक्षक विकास पवार वनपाल मदतनीस दौंड यांनी घटनास्थळी दाखल घेऊन सदरच्या बिबटयाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीचा पंचनामा केला.परिसरात तातडीने पिंजरे लावण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी वनधिकाऱ्याकडे केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here