मनसे नेते पानसे यांनी घेतली इंदोरीकरांची भेट, अर्धा तास चर्चा, इंदोरीकरांचे काम विसरून कसे चालेल – पानसरे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी इंदोरीकर महाराजांची सदिच्छा भेट घेतली होती. संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदोरीकर महाराज यांची भेट झाली. यावेळी दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. 

सध्या इंदोरीकर महाराज समतिथीला बायकोसोबत समागम केल्यास मुलगा तर विषमतिथीला केल्यास मुलगी होते, असे वक्तव्य केले होते. या विधानावरून त्यांच्यावर कडक टीका झाली होती. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर संस्थांनी या वक्तव्याचा पिच्छा पुरवित इंदुरीकरांवर तक्रार दाखल करून त्यांच्यावर संगमनेर न्यायालयात खटला सुरू आहे. त्यांना न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर पानसे यांनी इंदुरीकरांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली असून मनसे इंदुरीकरांच्या पाठीशी आहेत, असे दिसून येत आहे.

दरम्यान, पानसे यांनी इंदुरीकरांची आज सदिच्छा भेट घेतली असून त्यांनी केलेली सामाजिक आणि चांगली कामे विसरू शकत नाही, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here