प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जुलै महिना सुरू झाला की गणेशोत्सवाची तयारी सुरू होते. मात्र यंदाच्या वर्षी सर्व सणांप्रमाणे गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट पडणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सरकारने अनेक नियम लादले आहेत. मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे त्याच बरोबर भाविकांनाही नियम घालून दिले आहे. यंदा भक्तांना मंडपात जाऊन दर्शन घेता येणार नसून तसेच हार फूलही वाहता येणार नाही. 4 फूट पेक्षा मोठी मूर्ती नसावी, असे मागेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना स्पष्ट केले होते.

मंडळांसाठीची नियमावली,
Samsung EVO Plus Class 10 64GB MicroSD 80 MB/S Memory Card with SD Adapter (MB-MC64D)
₹ 835.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)SanDisk Extreme uSD,160 MB/s R, 60MB/s W,C10,UHS,U3,V30,A2,64GB, for 4K Video on Smartphones, Action Cams & Drones
₹ 949.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)- मंडपात एकावेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्ते राहू नयेत. मंडपात वावरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मास्क लावणे बंधनकारक.
- मंडपाच्या मुख्य भागाचे दिवसातून 3 वेळा निर्जंतुकीकरण करावे, कार्यकर्त्यांना सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे.
- मंडपाच्या लगत फुले, हार, प्रसाद यांच्या विक्रीचे स्टॉल लावता येणार नाहीत.
- आरतीला मंडपात जास्तीत जास्त 10 कार्यकर्त्यांना प्रवेश असेल. आगमन, विसर्जन याप्रसंगी मिरवणूक काढता येणार नाही. केवळ 10 कार्यकर्ते सहभागी होऊ शकतील.
- मंडप सजावट, देखावे, रोषणाई यांना मुरड घालून मंडळातर्फे जनजागरण, रक्तदान, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित केले जावेत. व्यावसायिक जाहिरातींनाही प्रतिबंध.
- भक्तीपर किंवा अन्य कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करता येणार नाही.
- कमीत कमी निर्माल्य तयार होईल याची काळजी घेणे.
- ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळून कोरोना रुग्ण, अन्य रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे.