Beed : जिल्ह्यात काल रात्रीपर्यंत 20 जण कोरोना पॉझिटिव्ह

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा प्रभाव वाढलेला असून बीड जिल्हा नऊ तारखेपर्यंत लॉकडाउन होते. काल दिनांक 10 रोजी जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन शिथील केले. काल संपूर्ण जिल्ह्यामध्ये 293 रुग्णांचे रिपोर्ट तपासणीसाठी पाठवले होते. काल उशिरापर्यंत त्यांचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये संपूर्ण बीड जिल्ह्यात 20 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
त्यामध्ये बीडचे आठ रुग्ण पॉझिटिव असून बाकीचे बारा रुग्ण बीड जिल्ह्यातील तालुकानिहाय आहेत. बीड जिल्ह्यामध्ये कोरुना रुग्णाचा प्रभाव वाढत असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले होते. ते लॉकडाऊन दहा तारखेला शिथिल झाले.
तसे पाहता कोरोना रुग्णाचा प्रभाव बीडमध्ये कमी होत नसून संपूर्ण बीड जिल्हा तणावात आहे. आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतील पुन्हा जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू करतील की काय अशी चिंता बीड वासियांना लागले आहे.
वाचा सविस्तर रिपोर्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here