Kopargaon : ते उर्वरित अहवालही निरंक !

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोपरगाव शहरात ओमनगर येथील एक डॉक्टर व त्यांचे कुटुंब कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती मात्र आज पर्यंत आरोग्य विभागाने १६५ जणांना ताब्यात घेतले त्यांची तपासणी करून त्यातील १५२ जणांना सोडून देण्यात आले होते तर २२९ जणांचे अहवाल तपासणी करण्यात आली होती. त्यातील १३ जण कोरोना बाधित आढळले होते.तर १२ जण रोगमुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले असून आज अखेर असलेले प्रलंबित १३ अहवालही आज दुपारी प्राप्त झाले असून ते निरंक आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर यांनी दिली आहे.त्यामुळे प्रशासनासह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.आता कोपरगाव शहर व तालुका कोरोना मुक्त झाला आहे. ही मोठी उपलब्धी मानली जात आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरात पहिला रुग्ण लक्ष्मीनगर या उपनगरात आढळला होता.त्यानंतर कोणताही रुग्ण नसताना आता मंगळवार दि.१ जुलै रोजी धक्कादायक घटना उघड झाली होती कोपरगाव शहरातील खडकी रस्ता मार्गावर असलेल्या ओमनगर परिसरात असलेल्या एका खाजगी डॉक्टरला व त्यांच्या वडिलांना या दोघांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून या खेरीज कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत मुंबईहून आलेल्या एका पाहुण्याला व पाठोपाठ त्याच्या मुलास कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब उघड झाली होती. त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली होती. या तीनही कोरोना बाधित रुग्णांना तातडीने कोपरगाव कोरोना केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले होते व हा परिसर तालुका प्रशासनाने प्रतिबंधित केला होता व त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य नागरिकांचा शोध सुरु केला होता.त्यात ओमनगर परिसरातील दोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १२ संशयित व्यक्ती आढळल्या होत्या.

या खेरीज टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व धारणगाव रस्त्यालगत रहिवाशी असलेल्या मात्र मुंबई येथून आलेल्या रुग्णांच्या संपर्कात नऊ अशा एकवीस संशयित व्यक्ती आढळल्या आहेत.त्यांना तातडीने ताब्यात घेतले होते तर दुसऱ्या टप्प्यात १९ संशयित ताब्यात घेऊन त्यांची कोपरगाव येथील कोरोना केंद्रात संस्थात्मक विलगीकरण कक्षात रवानगी केली होती त्यांचे श्राव तपासणीसाठी नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तातडीने पाठवले गेले होते. त्यातील सतरा अहवाल या आधीच निरंक आले होते मात्र नंतर पाठवले गेलेले १९ अहवाल व आधीचे दोन अहवाल असे तेवीस अहवाल ६ जुलै रोजी येऊन वीस संशयितांचे अहवाल आले असून ते निरंक आले होते. पाच अहवाल प्रलंबित होते मात्र आता संशयितांची संख्या आता तेरावर गेली होती मात्र त्यांचे श्राव तपासणी साठी नगर येथील प्रयोग शाळे पाठविण्यात आले होते.ते आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास प्राप्त झाले आहे.विशेष म्हणजे ते सर्व निरंक आढळून आल्याने सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला आहे.आता वर्तमानात एकही रुग्ण तालुक्यात व शहरात उपलब्ध नाही हि समाधानाची बाब आहे.त्यामुळे कोपरगाव तालुका आता पुन्हा एकदा कोरोना मुक्त झाला आहे.

तरीही आगामी काळात शहर व तालुका कोरोना मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांना अजून खबरदारी घ्यावी लागणार आहे. नजीकच्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आहेत.त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक वेळी व प्रसंगी बाहेर पडू नये. व आवश्यक वेळी आपल्या तोंडाला मुखपट्टी बांधण्याची काळजी घ्यावी असे आवाहन आ.आशुतोष काळे,तहसीलदार योगेश चंद्रे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसुंदर,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर.तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here