Beed : माजलगाव आणि बीड शहरात काही ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित; अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
माजलगावमधील जुना मोंढा आणि बीड शहरातील मिलीया कॉलेज, राजू नगर बालेपीर, संभाजीनगर बालेपीर येथे कोरोना विषाणूची लागण covid 19 positive झालेले रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे काही भागात कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अपर जिल्हा दंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
बीड शहरातील मिलिया कॉलेज परिसर, किल्ला मैदान परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजू नगर, बालेपीर परिसरातील मोहम्मद हनीफ आरेफ यांचे घर ते शेख नजीर शेख नईम (सेहरीश लेडीज वेअर) यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
संभाजीनगर, बालेपीर परिसरातील शेख खलीलूद्दीन शेख हफिजोद्दीन यांचे घर ते विजय कुमार किसनराव वीर यांच्या घरापर्यंतच्या परिसरामध्ये कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
माजलगाव येथील जुना मोंढा परिसरातील गणेश सोमेश्वर डिग्रसकर यांच्या घरापासून ते संजय बाबुराव मोटेगावकर यांच्या घरापर्यंत बिपीन विश्वास भावठाणकर यांचे घर ते अशोक कचरू जाधव यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. तसेच हा सर्व भाग अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली असून राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here