प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबियांना कोरोनाची लागण झाली आहे. खेर यांच्या आईसह त्यांचा भाऊ, वहिनी, पुतणी यांना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वतः अनुपम हे मात्र बचावले आहेत त्यांची कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
अनुपम खेर यांनी ट्विट करीत याबाबत माहिती दिली आहे. आपल्या आईसह भाऊ, वहिनी, पुतणी यांचे अहवाल होकारात्मक आल्याचे त्यांनी म्हटलय. तसेच त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात उचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांना सौम्य लक्षणं आहेत. अनुपम खेर यांच्या आईला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इतर सदस्यांचं घरातच विलगीकरण करण्यात आलं आहे.