प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर – शहरातील लक्ष्मीबाई कांरजा या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तो रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा परिसर 25 जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. या परिसरात आता जीवनावश्यक सेवा महापालिकेतर्फे पोहोचविण्यात येणार आहे.

या परिसरात रहदारीसाठी चित्रा टॉकीज शेजारून आतमध्ये जाणारा रस्ता असणार आहे. प्रतिबंधित क्षेत्र – चितळे रोड, मिरावलीबाबा दर्गा चौक, लक्ष्मीबाई कारंजा, चित्रा टॉकीज, जिल्हा नगर वाचनालय, चितळे रोड, मिरावलीबाब दर्गा चौक असा असेल.
बफर क्षेत्र – पापय्या गल्ली, रंगारगल्ली, पटवर्धन चौक, धनगर गल्ली, महाजन गल्ली, घुमरे गल्ली, गांधी मैदान, नवीपेठ, नेतासभाष चौक, जगदीशभुवन मिठाईवाले हॉटेलचा पाठीमागील परिसर, कुंभारगल्ली, जुनी छाया टॉकीज परिसर, नेहरू मार्केट ते पटवर्धन चौक परिसर बफर झोन राहील.