Rahuri : तालुक्यातील तांदूळवाडी येथे दोघांना तर म्हैसगाव येथील एकाला कोरोना

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी येथे दोघांना तर म्हैसगाव येथे एका व्यक्तीस कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांनी दिली.

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून राहुरी तालुक्यातही कमी प्रमाणात का होइना रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघत आहे. खासगी प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतर तांदुळवाडी येथील दोघांना तर म्हैसगाव येथील एकास कोरोनाची लागण झाली आहे, असे तालुक्याच्या शासकीय सुत्रांकडून समजले आहे.
तांदुळवाडी येथील दोघे राजकीय क्षेत्रातील तर म्हैसगाव येथील एक शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यक्ती असल्याचे समजते.
खबरदारी म्हणून या गावात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकान बंद करण्यात आले असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, राहुरी बुद्रुक, चिंचविहीरे, वांबोरी, ब्राम्हणी येथील एकूण चौघा जणांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, हे सर्व निगेटिव्ह आले असल्याने या गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तर तालुक्यातील अन्य १० जणांचे रिपोर्ट अद्याप प्रलंबित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here