प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
श्रीगोंदा – कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेंबरे यांनी स्वतःचा पगारवाढ करून घेतली होती. याबाबत उमेश पोटे संचालकांनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे यासंबंधी तक्रार केली असता त्यांनी पगारवाढ प्रकरणात सचिव ढेंबरेच दोषी असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सादर केला होता. याबाबत सविस्तर कारवाई चालू होतीच त्याच संबंधी आज उपजिल्हा निबंधक यांनी अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये सचिव डेबेरे यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की सहाय्यक निबंधक यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालात सचिव डेंबरे याच्या पगारवाढीच्या संदर्भात त्याच्यावर दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव यांना सुनावणीसाठी बोलाविण्यात आले होते.
त्या सुनावणीचा निकाल त्यांनी दिला असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला खालीलप्रमाणे निर्देश दिले आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे कृषी उत्पन्न बाजार समितीला सोसावे लागलेले आर्थिक नुकसान सचिव डेंबरे यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावे. तसेच दिलीप डेंबरे यांच्यावर विकास विनियमन १९६३व नियम १९६७तसेच मंजूर उपविधी सेवानियमातील तरतुदीनुसार शास्तीची कारवाई करावी व याचे अनुपालन करून याचा अहवाल ३० दिवसात सादर करण्याचे निर्देश उपजिल्हा निबंधक दिग्विजय आहेर यांनी सहायक निबंधक श्रीगोंदा याना दिले आहेत.