Shrigonda : दुकानदाराला जातीवाचक शिवीगाळ करीत कोयत्याने वार

1

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे एका दुकानदाराला जातीवाचक शिवीगाळ करीत कोयत्याने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी दत्ता उल्हारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी संतोष पठारे (रा.बनपिंपरी) याला अटक करण्यात आली आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव या ठिकाणी दत्ता उल्हारे हे जनरल स्टोअर्सचे दुकान चालवून आपली उपजीविका भागवतात. काल शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊच्या सुमारास घोगरगाव येथील दुकान उघडले सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुकान बंद करीत असताना बनपिंपरी येथील संतोष साहेबराव पठारे हा इसम फिर्यादीच्या दुकानात आला.

दुकानातून त्याने बेन्टेक्सच्या पाच अंगठ्या विकत घेतल्या तेव्हा त्या अन त्याचे पैसे दुकानदाराने मागितले म्हणून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. तसेच जातिवाचक शिवीगाळ करीत अर्वाच्च भाषेत बोलू लागला त्यानंतर त्याच्या जवळील ऊस तोडण्याच्या कोयत्याने फिर्यादीच्या छातीवर मारून जखमी केले याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3,1 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास विभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव हे करत असून पोलिसांनी तात्काळ आरोपीस जेरबंद केले आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here