Shrigonda CoronaUpdates : नवीन 8 रुग्ण, आज एकाची कोरोनावर मात, सक्रिय रुग्ण 12

0

शहरात ६ ,कोळगाव व वडाळीत अनुक्रमे १, तालुक्याला लॉकडाऊनची गरज…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. आज श्रीगोंदा शहरांमध्ये कोरोना बाधित डॉक्टरच्या संपर्कात येऊन ५ जण कोरोना पॉझिटिव झाले असून, बगाडे कॉर्नर येथे वास्तव्यास असलेल्या मात्र, मुळगाव सुरेगाव असणारा एक इसम कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. आज दिवसभरात श्रीगोंदा शहरासह तालुक्यात ८ जण कोरोना बाधित सापडले आहेत. तर, एकजण कोरोनातुन उपचार घेऊन बरा झाला आहे. याविषयी (तालुका आरोग्य अधिकारी) डॉक्टर नितीन खामकर यांनी माध्यमांना माहिती दिली आहे.

सोलापूर येथून प्रवास करून आलेल्या श्रीगोंद्यातील एकाडॉक्टरला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर शहरातील त्याच्या संपर्कात आलेल्या इतर पाचजणांना आज कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या व्यतिरिक्त कोळगाव येथील एक व्यक्ती तसेच वडाळी येथील एक व्यक्ती आणि सुरेगाव येथील एकाव्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आज दिवसभरात तालुक्यात ८ नवीन रुग्ण वाढल्याचे समोर आले आहे. तर एक जन कोरोना मुक्त झाल्याचे समजते आहे.

मिळालेला माहितीनुसार शहरातील पाच रुग्ण हे प्रतिबंधात्मक क्षेत्र परिसरातील आहेत. तालुक्यातील सक्रिय रुग्ण संख्या आता १२ वर पोहोचली असून, आत्तापर्यंत २९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले आहे. यातील १७ रुग्ण बरे झाले असून, १२नमूद रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. कोरोना संक्रमण झाल्यामध्ये कोळगाव, चिंभळे, वडाळी, श्रीगोंदा शहर, सुरेगाव, चांभुर्डी या गावांमधील लोकांचा समावेश आहे. आतापर्यंत तालुक्याच्या आरोग्य प्रशासनाने ३०लोकांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठवले असून, त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

(तालुका आरोग्य अधिकारी) डॉक्टर नितिन खामकर, (तालुका इन्सिडेंट कमांडर तथा तहसिलदार) महेंद्र माळी, (श्रीगोंदा पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव व (बेलवंडी पोलीस निरीक्षक) अरविंद माने यांनी स्थानिक प्रशासनामार्फत आव्हान केले आहे की, सर्वांनी या रोगाला आवर घालण्यासाठी प्रशासनाने दिलेले नियम तंतोतंत पाळणे गरजेचे आहे.

तालुक्याला लॉकडाऊनची गरज 

याचबरोबर वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता, तालुक्यात लॉकडाउन करणे आता काळाची गरज झाल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. वाढती गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घरात राहणे अनिवार्य  झाल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here