BreakingNews : कोव्हिड सेंटरवर जाऊन केले फेसबुक लाईव्ह; एका राजकीय व्यक्तीसह पत्रकारावर गुन्हा 

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह कोरोना सेंटर बनविले असून त्या ठिकाणी दोन महाभागांनी जाऊन फेसबुक लाईव्ह केल्यामुळे तेथील कोरोना बाधित लोकांनी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी एक राजकीय व्यक्ती तसेच एक पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. 

कोरोना झालेल्या लोकांबाबत सरकारकडून मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळली जात आहे. त्यात श्रीगोंदा शहरातील कोरोना सेंटर वर एक राजकीय पदाधिकारी आणि एक पत्रकार यांनी जाऊन कोरोना बाधित लोकांचे फेसबुक लाईव्ह केले. त्यामुळे कोरोना झालेल्या लोकांबाबत गोपनीयता भंग झाली असल्यामुळे कोरोना बाधित नागरिकांनी याबाबत अहमदनगर जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे तक्रार केली.
याबाबत जिल्हाधिकारी यांनी श्रीगोंदा तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांना एक राजकीय व्यक्ती आणि तथागतीत पत्रकार यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा तात्काळ अहवाल सादर करण्याचा आदेश दिले आहे. त्यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here