Shrirampur : रेशन कार्डधारकांना मोफत पाच किलो तांदूळा ऐवजी मिळणार तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ

1
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीरामपूर : पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणा-या पाच किलो तांदूळ ऐवजी आता माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार असल्याचे परिपत्रक शासनाचे सहसचिव मनोजकुमार सुर्यवंशी यांनी काढले आहे.

केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दिनांक ८ जुलैच्या पत्रान्वये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यासाठी माहे जुलै ते नोव्हेंबर या कालावधीसाठी मोफत वितरीत करावयाच्या अन्नधान्याचे नियतन प्राप्त झाले असून अंत्योदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना आता मोफत अन्नधान्य प्रति माणसी तीन किलो गहु व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे.
माहे एप्रिल मे व जून या महिन्यासाठी प्रति माणसी पाच किलो तांदूळ मोफत देण्यात आलेला होता. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजना माहे नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत अंत्योदय लाभार्थी व प्रधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रति माणसी पाच किलो धान्य मोफत देण्यात येणार असून त्यात माणसी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय अन्नधान्या व्यतिरिक्त उपलब्ध करुन देण्यात येत असून कुठलाही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे.
केंद्र शासनाच्या सूचना नुसार कोविड -१९ आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे भारतीय अन्न महामंंडळाच्या गोदामातून एकाच वेळी दोन महिन्याच्या अन्न धान्याची उचल करावी तसेच लाभार्थ्यांना दोन महिन्याचे अन्नधान्य एकाच वेळेस वितरीत करावे, असेही परिपत्रकात म्हटले आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी करिता अतिरिक्त नियतनानुसार अन्नधान्याचा साठा मूक्त करण्याच्या सूचना भारतीय अन्न महामंडळास स्वतंत्रपणे देण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी ४२९३४९ आहे तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी २६४०१६४ आहे दोन्ही योजनांचे मिळून एकुण लाभार्थी  ३०६९५१३ आहेत. त्या नुसार जिल्ह्याला ९२०९ गहु व ६१३७ टन तांदूळ दिला जाणार आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here