प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
बेलापूर : वाढता कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागाकडे हातपाय पसरवत आहे. त्यातच कोरोना विषाणूवर कोणतेही ठोस औषध उपलब्ध नसल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. या पार्श्वभूमीवर बेलापूर गावातील सुमारे साडेतीन ते चार हजार कुटुंबांना अर्सेनिक अल्बम – 30 या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असल्याचे जिप सदस्य शरद नवले यांनी सांगितले.
सदर गोळ्यांचे वाटप बेलापूर येथील लोकमान्य फाऊंडेशन डॉ.रविंद्र गंगवाल व बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यावतीने होणार आहे. त्याची सुरुवात रविवार दिळ 12 रोजी जिप सदस्य शरद नवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.देविदास चोखर, डॉ. रविंद्र गंगवाल, रणजीत श्रीगोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ज्येेष्ठ पत्रकार देविदास देसाई यांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी बोलताना शरद नवले म्हणाले की, बेलापूर गावामध्ये एक कोरोना रुग्ण सापडल्याणे गावाची धास्ती वाढली होती; पण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांचे प्रयत्न व सर्व संस्था, सामाजिक कार्यकर्ते गावातील सुज्ञ नागरिक यांच्या दक्षतेमुळे एकापेक्षा जास्त रुग्ण वाढले नाही या बद्दल त्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. त्याचबरोबर पुढील खबरदारी म्हणून लोकमान्य फाऊंडेशन, डॉ.रविंद्र गंगवाल व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलापूर यांच्यावतीने गावातील साडेतीन ते चार हजार कुटुंबांना आर्सेनिक अल्बम – 30 या रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्या गोळ्यांचे मोफत वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण भागामध्ये देखील त्याचा शिरकाव होत आहे. त्यातच कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नाही. स्वयंशिस्त आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे एवढेच पर्याय असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चोखर यांनी सांगितले.
याप्रसंगी जि.प. सदस्य शरद नवले, टॅक्सी युनियनचे अध्यक्ष सुनिल मुथ्था, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रणजीत श्रीगोड, पत्रकार देविदास देसाई, डॉ. रविंद्र गंगवाल, डॉ. देविदास चोखर, अजय डाकले, अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे, प्रफुल्ल डावरे, पप्पू खरात, दादा कुताळ, पत्रकार सुहास शेलार, अशोक शेलार, दीपक क्षत्रिय, पत्रकार किशोर कदम, दिलीप दायमा यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.
