चोरट्यांकडून दारू दुकानांना टार्गेट

0

प्रवरा संगम येथे देशीचे 36 बॉक्स चोरले

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

नेवासा : श्रावणाचे लवकरच आगमन होणार असल्याने आखाड पांदी ही बर्‍याच ठिकाणी सुरू आहे त्यातच आखाड निमित्ताने चोरट्यांनीही दारू दुकानांना टार्गेट केले असल्याची चर्चा मद्यपींमध्ये होत असून नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथे देशीचे 36 बॉक्स चोरट्यांनी पळून नेले असल्याची घटना घडली आहे.
प्रवरासंगम येथे देशी दारूचे सरकारमान्य दुकान आहे रोडवरच असलेल्या या दुकानामध्ये मद्यपींची बर्‍या पैकी सोशल डिस्टनसिंगचे पालन करत गर्दी असते यातच परिसरात एरवी भुरट्या चोर्‍या करणार्‍या चोरट्यांनी देशी दारूलाच लक्ष केले दुकानातील सुमारे 36 बॉक्स चोरट्यांनी पळवून नेल्याची खबर दुकान चालकाने पोलीस स्टेशनला केली आहे.
शटर उचकटून व त्यानंतर येणारा आतील दरवाजा तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला त्यामध्ये त्यांनी एकूण 36 बॉक्स चोरून नेले दुकान मालकाने पोलीसांना खबर दिल्यानंतर पोलीसांनी दारू दुकानात येऊन पंचनामा केला.त्यानुसार एकूण 36 बॉक्सची चोरी पहाता चोरटे हे एकापेक्षा अधिक असावे असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून अज्ञात चोरटयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here