दुकान चालू ठेवले 9 जणांविरुद्ध कारवाई

0

प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

जालना : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात 15 जुलैपर्यंत संचारबंदी लागु केलेली आहे. शहरात सर्वत्र कडक अळमलबजावणी होत असतानाच काही महाभाग संचारबंदीचे उल्लंघन करीत आहेत.
सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख, पोलिस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी आज 4 अंडीविक्रेते, 4 किराणा दुकानदार आणि एक हॉटेलचालक, अशा 9 जणांवर कारवाई केली. सदर बाजार पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here