प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कर्जत : कर्जत शहरातील प्रसिद्ध वैद्यकीय डॉक्टर यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली. या वृत्ताने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अनेक महिन्यापासून कोरोनामुक्त शहरास बुधवारी नजर लागली आणि कर्जत शहरात प्रथमच कोरोना रुग्ण आढळला आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या १६ झाली आहे.
कर्जत शहरातील प्रसिद्ध असणारे वैद्यकीय डॉक्टर यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड यांनी दिली. सदरची वार्ता शहरात पसरली असता नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले होते. या कोरोना बाधित वैद्यकीय डॉक्टर यांची प्रॅक्टिस उत्तम असल्याने काही काळ घबराटीचे वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने स्थानिक नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी वैद्यकीय डॉक्टर यांच्या निकट संपर्कात असणारे २० व्यक्तींना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यासह सदरचा परिसर नगरपंचायतीद्वारे निर्जंतुक करण्यात आला असून प्रतिबंधित करण्यात आला आहे. नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्जत तालुक्यातील एकूण कोरोनाबाधीत रुग्णाची संख्या १६ झाली आहे.