प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
ढोरजळगांव – यावर्षी कांदा पिकाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी चाळीतच साठवणुकीतला निम्मा कांदा सडल्यामुळे शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
गेल्या काही वर्षात कांदा पिकांतून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत असून कांद्याचे दर अत्यंत कमी आहेत. व्यापारी वर्गाकडून ही शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होत असताना मार्च ते मे महिन्यात उन्हाळी कांद्याच्या विक्रीचा हंगाम आसतो. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर बाजार समित्या बंद असल्यामुळे व कांद्याची राज्याअंतर्गत विक्रीही कोरोनामुळे बंद तर कमी मनुष्यबळ असल्यामुळे काही बाजार समिती कधी बंद कधी चालू असल्यामुळे व राज्यातच काद्यांंला मागणीच नसल्यामुळे कांदा विक्रीच करता आली नाही.
कोरोनाचे संकट टळल्यावर भाववाढ होईल या भाबड्या आशेवर कित्येक शेतकऱ्यांनी कांदा चाळीत कांदा भरला खरा मात्र सद्यस्थितीत कांदाचाळीत राहून ८० टक्के कांदा चाळीतच सडून गेला असल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला एकीकडे कोरोनाने देशाला धास्ती भरविली असताना कोरोनाचा सर्वात मोठा फटका शेतमालाला बसला आहे.
शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नाफेड हमीभावाने कांदा खरेदी केद्र सुरु करण्यात आले असून थोड्याप्रमाणात दिलासा मिळत असला तरी कांदा खरेदीसाठी कांदा चाळी उपलब्ध होत नसल्यामुळे कांदा घेणे सुद्धा मुश्किल बनले असून व खरेदी करून साठवणूक केलेला कांदा किती दिवस टिकाव धरू शकतो ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. कांदा का खराब होत आहे. हा संशोधनाच विषय आहे. दरवर्षी पेक्षा जास्त कांदा यावर्षी खराब होत आहे.
अनिलराव मडके सभापती कृषिऊत्पन्न बाजार समिती – शेवगांंव
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हातील बहुतांश बाजार समित्या बंद होत्या. तरीही शेवगांव कृषिऊत्पन्न बाजार समितीने सुरुवातीपासून शेतकऱ्यांच्या हितावह निर्णय घेत घुले बंधूंच्या नेतृत्वाखाली व्यापारी, शेतकरी संघटना, शेतकरी यांची बैठक घेऊन बंदच्या काळातही सोशल डिस्टसिंग पाळत कांदा खरेदी करण्यात येत आहे. मात्र, तरीही जिल्ह्याबाहेर कांदा जात नसल्यामुळे व मागणी कमी आसल्यामुळे कांद्याचे दर अत्यंत कमी असून कोरोनाचा फटका मोठ्या प्रमाणात बसत आहे.