Shrirampur : सोनसाखळी चोरणारा तडीपार गुंड साथीदारासह अटकेत

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहर पोलिसांंची कारवाई

श्रीरामपूर – सोनसाखळी चोरणारा तडीपार आरोपीला जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश मिळाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, १६ जूनला दुपारी पावणेचारच्या सुमारास फिर्यादी पुष्पा मच्छिद्र हिरे (रा. मोरगेवस्ती वाॅर्ड नं.७.श्रीरामपूर) या अक्षय कॉर्नर ते सिद्धीविनायक चौक जाणारे रोडवर स्कुटी मोटारसायकलवरुन एकट्या जात असताना राहिज हॉस्पिटल पुढे पाठीमागून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर काळपट रंगाचे कपडे घातलेल्या दोन अज्ञात इसमांनी येऊन त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण बळजबरीने ओढून चोरुन नेले, अशी फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा सखोल व बारकाईने तपास केला असता तो श्रीरामपूर शहरातील सराईत व तडीपार गुंड आनंद यशवंत काळे याने त्याचा साथीदार सनी भोसले याच्यसह केला असून त्यांनी गुन्ह्यात एक अपाची मोटारसायकल वापरली आहे. तसेच ते पुन्हा शहरात येणार आहेत, अशी माहीती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.

या माहितीच्या आधारे डी.बी.पथकाचे पोसई संतोष बहाकर, पो.हे.कॉ.जे.के.लोंढे,पो.कॉ.अर्जुन पोकळे,पो.कॉ.किशोर जाधव, पो.कॉ.पंकज गोसावी, पो.कॉ.सुनिल दिघे, पो.कॉ.गणेश गावडे,पो.कॉ.महेंद्र पवार यांचे पथकाने नॉर्दन बेंच परिसरात सापळा लावून तडीपार आरोपी नामे १) आनंद यशवंत काळे रा. सुतगिरणी परिसर,दत्तनगर ता.श्रीरामपूर (२) सनि विजय भोसले रा. दत्तनगर ता.श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे एक गुन्ह्यात वापरलेली अपाचे मोटारसायकल क्रमांक एम.एच.१७ ए.टी.४६१२ जप्त केली असून चोरीच्या सोन्याबाबत अधिक तपास करीत आहेत. दोन्ही आरोपींवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह,अप्पर पोलीस अधिक्षक डाॅ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह पोसई.संतोष बहाकर,पोसई समाधान सुरवाडे ,तपास पथकाचे पोहेकॉ.जे.के.लोंढे, पोको.किशोर जाधव, पो.कॉ.अर्जुन पोकळे, पोकॉ। सुनिल दिघे, पो.काॅ.पंकज गोसावी, पो.कॉ.महेंद्र पवार, पो.कॉ.गणेश गावडे,पो.कॉ.शितल कांबळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here