HSC Results : 12वीचा निकाल जाहीर 90.66 % राज्याचा निकाल; विद्यार्थ्यांनो असा पहा निकाल

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर 12वीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला असून याही वर्षी कोकण विभागाने टॉप केले आहे. त्यापाठोपाठ पुणे विभागाचा नंबर लागतो. तर औरंगाबाद बोर्डाचा निकाल सगळ्यात कमी लागला आहे. 

बारावीचा निकाल खालील वेबसाईटसवर पाहता येईल 

  • www.mahresult.nic.in 
  • www.hscresult.mkcl.org
  • www.maharashtraeduction.com
  • असा पाहा निकाल 

    💠निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या कोणत्याही वेबसाईटवर जा.

    💠त्यानंतर तुम्हाला HSC BOARD RESULT नावाचा ऑप्शन दिसेल.

    💠त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सीट नंबर स्पेसशिवाय टाईप करावा लागेल.

    💠त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षर टाकावी लागतील. म्हणजेच समजा तुमचा नंबर M123456 असा असेल आणि तुमच्या आईचे नाव रेश्मा असेल, तर तुमच्या पहिल्या रकान्यात M123456 हा सीट नंबर येईल आणि दुसऱ्या रकान्यात आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच RES असे लिहावे लागेल.

    💠यानंतर लगेचच तुम्हाला तुमचा निकाल स्क्रीनवर पाहाता येईल

    💠निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला तो डाऊनलोडही करता येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची प्रिंटआऊटही काढता येणार आहे.

    एसएमएसवर निकाल

    बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल. (MSBSHSE HSC Result 2020)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here