Ahmednagar : जिल्ह्यात १६७ जणांना कोरोना; दोन दिवसांत कोरोनाचे सात बळी

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

पाथर्डीत कोरोनाचा उद्रेक

नगरः नगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना प्रयोगशाळेत आज दिवसभरात एकूण ११५ रुग्णांचे अहवाल होकरात्मक आले आहेत. याशिवाय, खासगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५२ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. जिल्ह्यात एकाच दिवसात १६७ रुग्म आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांकी आकडा आहे. दरम्यान, आता पाथर्डी हे कोरोनाचा केंद्रबिंदू झाला असून एकाच दिवसांत ३२ जणांना कोरोना झाला आहे. नगर, संगमनेर, श्रीरामपूरनंतर पाथर्डीतील रुग्णसंख्या अधिक आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत कोरोनाने सात बळी घेतले. त्यात बुधवारी चार तर गुरूवारी तीन बळी घेतले.

जिल्ह्यात आज सकाळी 32 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. खाजगी प्रयोगशाळेचे अहवाल वेगळे आहेत. यात नगर शहरातील 16, संगमनेर 11, आणि श्रीगोंद्यामधील पाच जणांचा समावेश आहे.

सकाळच्या 32 जणांच्या अहवालानुसार नगर शहरातील पाईपलाईन रोड, भराडगल्ली, बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा, राऊतमळा, गायकवाड मळा, नगर शहरातील गवळीवाडा, फकीरवाडा, झेंडीगेट आणि शहराच्या मध्यवर्ती भागात हे रुग्ण आढळले आहेत. बुधवारी रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल होकारात्मक आले. काल 49 जणांचे अहवाल होकारात्मक आले होते. काल दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.

सायंकाळी ६५ व्यक्तींचे अहवाल होकारात्मक आले. त्यात यामध्ये पारनेर तालुक्यात चार (सिध्देश्वरवाडी तीन, खडकवाडी एक,) पाथर्डी ३२ (आगासखांड दोन, कोल्हुबाई कोल्हार नऊ,  तिसगाव तीन, त्रिभुवनवाडी  चार, खाटीकगल्ली पाथर्डी 14),  कोपरगाव आठ (सुरेगाव),  नेवासे एक (शिरसगाव),  नगर ग्रामीण १३ (नागापूर दोन, पोखर्डी आठ, देऊळगाव एक, सांड सांडवा दोन), नगर शहर दोन,  जामखेड तीन (दिघोळ दोन, लहानेवाडी एक) आणि श्रीगोंदे एक (घोगरगाव), संगमनेर खुर्द एक  अशा रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवाशातील सहा, अकोले दोन, संगमनेरमधील तीन आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान संगमनेरमधील पाच जणांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात आली. ती होकारात्मक आली. जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोना झाला. १७ अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील दहा, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. नगर शहर, संगमनेर पाठोपाठ पाथर्डीमध्येही मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.

सावेडीतील गंगा उद्यानलगत असलेल्या पंकज कॉलनी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. पंकज कॉलनी परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. २९ जुलैपर्यंत हा परिसर सील करण्यात आला आहे. महापालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी यासंदर्भात आज आदेश काढला.

या आदेशानुसार पंकज कॉलनीमधील मुख्य रस्त्यावरील ग्रीन प्लॅनेट नर्सरी, माखिजा यांचे घर, रेखा गोविंद निवास, चोळके यांचे घर ते ग्रीन नर्सरी पर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून राहील. बफर झोनमध्ये गंगा उद्यान व खुली जागा, मिस्कीन मळा वसाहत, आशा हाऊसिंग सोसायटी, समतानगर, राज्य कर्मचारी सोसायटी कार्यालय, जिजामाता व बालाजी कॉलनी, सीक्यूएव्हीचा पश्चिमेकडील परिसर राहणार आहे.

शहरात संचारबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत

शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून शहरातील रात्रीच्या संचारबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनी घरातच रहाणे आवश्क असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनामीटर

*उपचार सुरू असलेले रुग्ण-५१६

*बरे झालेले रुग्ण- ७७३

मृत्यू: ३३

एकूण रुग्ण संख्या:१३२२ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here