प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
नगर : जिल्ह्यात आज दुपारी 17 जणांना कोरोना झाला असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. सतरा अहवालांमध्ये पाथर्डी तालुक्यातील 10, नगर तालुक्यातील वडारवाडीमधील दोन, घोसपुरीमधील एक आणि राहुरीमधील चार रुग्णांचा समावेश आहे. नगर शहर, संगमनेर, नेवासे पाठोपाठ पाथर्डीमध्येही मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत.