Shevgaon : गावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शेवगाव येथील मिरी रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात शेवगाव पोलिसांनी काल बुधवारी सांयकाळी साडेपाचच्या सुमारास एका गावठी बनावटीच्या कट्टयासह दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

सुनिल विजय भाकरे (वय २६) व पांडूरंग रामकृष्ण वाळके (वय १९) दोघे राहणार नागापूर ता. नगर अशी आरोपींची नावे असून ते नगरहून मिरी मार्गे एम.एच. १६ सी.एन.९६३२ क्रमांकाच्या मोटरसायकलवरून येत असताना सासूरवाडी धाब्याजवळ शेवगाव पोलिसांनी लावलेल्या सापळयात आडकले. त्यांची अंग झडती घेतली असता भाकरे याचे जवळ एक गावठी बनावटीचा कट्टा (पिस्टल) व एक जिवंत काडतूस मिळून आले. शेवगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना त्यांच्या खास खबऱ्यामार्फत ही माहिती मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात दोघे अडकले.

जिल्हा पोलिस अधिक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलिस अधिक्षक सागर पाटील, उप अधिक्षक मंदार जवळे यांचे मार्गदर्शनाखाली निरीक्षक रामराव ढिकले, स .पो.नि.सुजित ठाकरे, स.पो.नि सोपान गोरे, पो कॉं. महादेव घाडगे, कैलास पवार, भनाजी काळोखे, किशोर शिरसाठ, संदिप दराडे याचे पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here