प्रतिनिधी |राष्ट्र सह्याद्री
नगर – जिल्ह्यात आज सकाळी 54 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. नगर शहरात दहा, शेवगावमध्ये दहा, पारनेर नऊ, संगमनेरमधील सहा, श्रीरामपूर आणि अकोले तालक्यात प्रत्येकी चार, नगर आणि नेवासे तालुक्यात प्रत्येकी तीन, जामखेड आणि कर्जत येथे प्रत्येकी दोन, पाथर्डी एक असे हे रुग्ण आढळले आहेत.

नगर शहरात मार्केटयार्डमध्ये तीन, नालेगाव एक, केडगाव एक, भिस्तबाग चौक एक, सुडके मळा एक, रेल्वे स्टेशन येथे एक, बागडपट्टी येथे एक रुग्ण आहे. अकोले तालुक्यातील हसे निवास येथील तीन, लहित येथे एक, जामखेडमधील सोनेगाव, साकत, नगर तालुक्यातील निंबळक, घोसपुरी, निमागाव घाणा, पाथर्डी शहर, शेवगाव शहर आणि मुंगी येथे प्रत्येकी पाच, कर्जत शहर व माहिजळगाव येथे प्रत्येकी एक, नेवासे येथील सोनईत तीन, पारनेरमधील लोणी माळवा येथे तीन, खडकवाडी येथे एक, पिंपळगाव रोटा येथे दोन, वडनेर बुद्रुक, कजुर्ले हर्या आणि कुंभकर्णवाडी येथे प्रत्येकी एक, श्रीरामपूरमधील प्रभाग सहामध्ये, श्रीरामपूर शहर, शिरसगाव व बेलापूर येथे प्रत्येकी एक, संगमनेरमधील गुंजाळवाडी आणि कुरण येथे प्रत्येकी तीन रुग्ण आढळले आहेत.