Beed : गेवराई शहर व तालुक्यातील या ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित, अनिश्चित कालावधीसाठी संचारबंदी 

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड – गेवराई शहरातील मोमीन कॉलनी आणि गेवराई तालुक्यातील मौ. मादळमोही येथे कोरोना विषाणूची लागण (covid 19 positive) झालेले रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे या रुग्णाच्या घराच्या परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
बीड जिल्ह्यातील इतर ठिकाणी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 नुसार मोमीन कॉलनी गेवराई शहर हसमोद्दीन सौदागर  यांचे घर ते नूरजान बाबर अजी मिर्झा यांचे घरापर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन Containment Zone  म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच गेवराई तालुक्यातील मौ.मादळमोही  येथील बालाजी मंदिर गल्लीतील इंदुबाई नवनाथ भोपळे यांचे घर ते बालाजी मंदिर पर्यंतचा परिसर कंटेनमेंट झोन Containment Zone  म्हणून घोषित करण्यात आला आहे
या दोन्ही ठिकाणी पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येऊन संचारबंदी लागू करण्यात येत आहे.
राज्य शासनाने लॉक डाऊन कालावधी 31 जुलै 2020 पर्यंत वाढविला असल्याने त्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 जुलै 2020 रोजीच्या रात्री 12 पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम 144 (1) (3) लागू करण्यात आले आहेत. सदर आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here