प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या आजोबा (वय-५३) यांनी आपल्या चौदा वर्षीय नातीचे राहत्या घरातून अज्ञात आरोपीने सोमवार दि.१३ जुलै रोजी राहते घरातून रात्री अकरा वाजेच्या सुमारास अपहरण केले असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने पढेगाव परिसरासह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth V5.0, Immersive Audio, Up to 14H Total Playback, Instant Voice Assistant, Easy Access Controls with Mic and Dual Tone Ergonomic Design(Cherry Blossom)
₹ 999.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Samsung Galaxy M21 (Midnight Blue, 4GB RAM, 64GB Storage)
₹ 12,499.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)या घटनेत अज्ञात आरोपीने आपल्या नातीला आपले राहते घरातून आपल्या समंती शिवाय कायदेशीर रखवालीतून अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे. अशी फिर्याद अपहरण केलेल्या मुलीच्या आजोबांनी दाखल केली आहे.
या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं.१६५/आय.पी.सी.३६३ प्रमाणे काल उशिरा नोंद केली आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.दरम्यान कोपरगाव तालुक्यात मुलींच्या गायब होणाऱ्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. मागील आठवड्यातच दोन घटना तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी या वयोगटातील आपल्या पाल्यांकडे अधिक लक्ष ठेवावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.