Rahuri : राहुरी कारखाना येथे पती पत्नी कोरोना बाधित; लॉकडाऊन तोडून नगरपालिका कामगारास शिविगाळ; एका विरुद्ध गुन्हा दाखल

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

देवळाली प्रवरानगर पालिका हद्दीतील राहुरी कारखाना येथे ताहाराबाद रोड लगत असलेल्या एका वसाहतमध्ये पती पत्नी  असे दोघे कोरोनो बाधित असल्याचे खाजगी प्रयोगशाळेच्या तपासणीतून निष्पन्न झाले आहे. देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत 7 व्यक्ती कोरोना बाधित निघाले आहेत. तर कराळेवाडी येथील  एक वसाहतीत लॉकडाऊन करण्यात आले. या वसाहतीतील शिवराज तारडे यास नगर पालिका कामगारांनी बाहेर जाऊ दिले नाही नगर पालिका कामगारास शिविगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी राहुरी कारखाना येथील ताहाराबाद रोड लगत असलेल्या वसाहतीमधील पती पत्नी कोरोना बाधित आढळले आहेत. या दोघांनी खाजगी प्रयोग शाळेत स्ञावची तपासणी करुन घेतली होती. त्यात ते बाधित आढळले. दोन दिवसापूर्वी एक प्रगतशिल शेतकरी कोरोना बाधित आढळला होता. त्याच्यावर उपचार चालू असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ व त्यांचे पथक मुख्याधिकारी अजित निकत शोध घेत असताना सातत्याने संपर्कात असलेले पती पत्नी यांचा स्ञाव खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविला असता ते दोघेही बाधित असल्याचे निष्पन्न झाले.

नगरपालिकेने कन्टेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. राहुरी तालुक्यातील राजकीय नेत्याचा वाहन चालकाचे कुटुंब बाधीत निघाल्यानंतर कराळेवाडी येथील वसाहत पञे ठोकून लॉकडाऊन करण्यात आले आहे. या वसाहतीमधील शिवराज सोपान तारडे या तरुणास पञे ठोकलेल्या ठिकाणाहून जाऊ दिले नाही. नगर पालिका कामगारास शिविगाळ केली. या प्रकरणी नगर पालिकेचे कामगार सुनिल कल्हापूरे यांच्या फिर्यादी वरुन कलम 186 नुसार राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here