Shrirampur : कोरोनाचा संसर्ग वाढला; नव्याने रूग्णाची संख्या वाढली; गळनिंब गाव चार दिवस लाॅकडाऊन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्गजन्य रोगाचा शिरकाव करायला सुरुवात झाली आहे काल रात्रीत उशिरा श्रीरामपूर शहरासह, ग्रामीण भागात एकूण सात रूग्ण कोरोनाबाधीत आढळले अशोकनगर, बेलापूर खुर्द, भोकर व गळनिंब येथील एका तरूणाचा रिपोर्ट कोरोना बाधित आला आहे. बेलापूर खूर्दमधील एका वृद्ध महिला, व गळनिंब मधील तरूणाचा रिपोर्ट कोरोनाबाधित आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आतापर्यंत तालुक्यात कोरोना संसर्ग रोगामुळे तिघांचा जीव गमवावा लागला आहे. सध्या येथील संतलूक रूग्णालयात अॅक्टीव रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वडाळा महादेव व शिरसगाव येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहात संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे. ग्रामीण रूग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या कोरोनाचा धोका वाढत असला तरी शहरातील गर्दी कमी होताना दिसत नाहीत. त्याच बरोबर ग्रामीण भागात गर्दीत गर्दी पहावयास मिळत आहे. त्याबरोबर विनाकारण फिरण्याची संख्या अधिक आहेत. सोशल डिस्टन्सिंग नियमांचा उल्लंघन होत असून अनेक जण विना मास्कचे फिरतात. त्यामुळे पुढील काळात अधिक रूग्णाची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बेलापूरात व गळनिंब कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. ज्या भागात रूग्ण सापडले आहे. तो पूर्ण भाग सील करून कन्टेन्मेंट झोन म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषीत करण्यात आलेला आहे. तेथील तरूण त्यांच्या कोरोनाबाधीत चुलत भावाला भेटायला नगरला गेला होता. त्यामुळे आई,वडिलनांही होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तो बाधित तरूण कोणाकोणाच्या संपर्कात आला? आणखी तो कुठे कुठे फिरला? यांचा प्रशासन शोध घेत आहे तलाठी वायखिंडे ग्रामसेवक राजू ओहोळ,आरोग्यसेविका ब्राम्हाणे, संरपच ज्योतीताई जाटे,आदीसह कर्मचारी हे बारकार्ईने लक्ष ठेवून आहेत. कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने गळनिंब गाव चार दिवस लाॅकडाऊन करण्यात आले असल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here