Breaking News : राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचे कोरोनामुळे निधन

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जुन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे यांचे कोरोना मुळे निधन झाले आहे. ते पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. आज रविवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिनेश दुबे यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. दुबे हे राष्ट्रवादीचे एक लढवय्ये व खंबीर नेते होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक बड्या नेत्यांनी यावर शोक व्यक्त केला.

दिनेश दुबे हे जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. ते विद्यमान नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणूनही कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. लागण झाल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला नाही. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here