Shrigonda : युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी योगेश मेहत्रे

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – काल संगमनेर येथे झालेल्या काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सामाजिक कामाची दखल घेऊन श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी योगेश विजय मेहत्रे यांची निवड करण्यात आली.

महाराष्ट्र राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय सचिव हेमंत ओगले युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. गोरख बायकर यांच्या नेतृत्वाखाली निवड करण्यात आली. युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी मेहत्रे यांच्या निवडीचे जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब थोरात, महिला बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपक पाटील भोसले, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, माजी उपनगराध्यक्ष राजुदादा गोरे, नगरसेविका सिमाताई गोरे, शिवनेरी युवा प्रतिष्ठान आदींसह मान्यवरांनी निवडीचे स्वागत केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here