Shrigonda : शिरुरच्या संपर्कामुळे देवदैठणमध्ये कोरोनाची एंट्री; प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून पाच दिवस गाव बंद 

0
उक्कडगाव | प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
शिरुर (जि. पुणे) येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथे कोरोनाची एंट्री झाल्याने प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून संपूर्ण गाव बंद करण्यात आले आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी कोरोनाने शिरकाव केला असून येळपणे गटात कोंडेगव्हाण, येळपणे, चांभूर्डी पाठोपाठ शिरुरच्या संपर्कामुळे  देवदैठणमधेही कोरोनाची एंट्री झाली आहे. रविवार दि. १९ जुलै रोजी देवदैठण येथील बसस्थानका शेजारी राहणा-या एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले.
या महिलेचा पती शिरूर येथील खाजगी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून कामाला जात होता. काही दिवसांपूर्वी संबंधित रुग्णालयातील डॉक्टर कोरोना बाधित आढळले. त्यानंतर या महिलेच्या पतीस ताप येऊ लागला. कोरोनाबाधित डॉक्टर आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तिला ताप आल्यामुळे देवदैठण येथील आरोग्य सेविका जयश्री सरोदे व सुनीता यादव यांनी तातडीने या दोघांना उपचारासाठी श्रीगोंदा येथील उपचार केंद्रात पाठवले. तेथून त्यांच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठवले असता महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.
तिच्या पतीचा अहवाल अजून येणे बाकी असून घरातील अन्य आठ सदस्यांनाही तपासणीसाठी श्रीगोंदा येथे पाठविण्यात आले आहे. कोरोनाच्या एंट्रीमुळे गावात घबराहटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तहसीलदार महेंद्र माळी यांच्या आदेशानुसार माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, वसंत बनकर यांनी गावात तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या असून संपूर्ण गाव प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून पुढील पाच दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here