National Breaking : रशियात कोरोनाच्या लसीचे मानवी ट्रायल पूर्ण! राष्ट्राध्यक्ष पूतिनसह अधिका-यांना एप्रिलमध्येच देण्यात आली होती

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

रशियात कोरोनाच्या लसीचे मानवी ट्रायल पूर्ण झाल्याचा दावा रशियन संशोधकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे रशियातील एका अहवालानुसार रशियाचे राष्ट्राध्यक्ष पूतिन आणि उद्योगपती तसेच अधिका-यांना एप्रिलमध्येच ही लस देण्यात आली होती. 

ब्लूमबर्गने या संबंधीचा अहवाल दिला आहे. या अहवालात राष्ट्रपती पुतिन यांना लस दिली की नाही, याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र, तेथील उद्योगपतींना तसेच सरकारी अधिका-यांना एप्रिलमध्येच ही लस देण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली आहे.

जगभरात कोरोनावर लस शोधण्याचे कार्य सुरू असून रशियन संशोधक त्यात एक पाऊल पुढे आहे. मात्र एप्रिलमध्येच ही लस निर्मित करण्यात आणि आता मानवी ट्रायल पूर्ण झाले असेल तर याची माहिती का देण्यात आली नाही. यावरून हा दावा खरा की खोटा अशा चर्चा सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here