Jalna : लॉकडाऊनमध्ये दुचाकी वाहने चोरणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या

0

चंदनझिरा पोलिसांनी केल्या 4 दुचाकी जप्त

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
 

लॉकडाऊन दरम्यान चंदनझिरा हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक इसम संशयीतरित्या दुचाकीवर फिरताना मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळील दुचाकीच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता, तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही.
सचिन पाटीलबा जिगे (वय 22, रा. मठ पिंपळगाव ता.अंबड) व आकाश मोटरकर (रा.चंदनझिरा) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांनी पोलिसांना MIDC व चंदनझिरासह विविध भागातून चार मोटारसायकल चोरीची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलीस नाईक नंदलाल ठाकूर , पोलीस कर्मचारी ,अनिल काळे, विजय साळवे, यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here